चोपड्यात 7 गावठी कट्टे जप्त ,2,28,530 रू चा मुद्देमाल हस्तगत

चोपडा : चोपडा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना बसमधून गावठी कट्ट्यांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचत चुंचाळे ता. चोपडा येथील बस स्टँडवर बलवाडी-चोपडा बस क्रमांक एम एच 40 एन 9064 मधून प्रवास करणाऱ्या दोघा संशयीतांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून तब्बल सात गावठी कट्टे जप्त केलेले आहेत. दीपक विजय वर्मा (वय 36, हेंगवाल खुर्द, ता.लुधियाना, पंजाब) व बलजितसिंग सारगनसिंग सरदार (वय 28, बस्ती बाजीगड, अहियापूर उरमर, हुशियारपूर, पंजाब) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यात 2,10,000 रू किंमतीचे 7 गावठी कट्टे ,17,000 रू किंमतीचे मोबाईल आणि 1530 रूपयांची रोकड असा एकूण रक्कम 2,28,530 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.या दोघा आरोपीं विरूध्द चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.