रंजक माहितीवृत्तविशेष
Trending

जगातील सर्वात वृद्ध रॉयल बंगाल टायगर ‘राजा’चा 26 व्या वर्षी मृत्यू , देशातील प्राणीप्रेमी हळहळले

नवी दिल्ली, 11 जुलै : भारतातच नव्हे तर जगातील सर्वात वृद्ध वाघ ‘राजा’चा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. SKB रेस्क्यू सेंटरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजा याचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाले. पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आलं होतं. वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजा हा देशातील सर्वात जास्त काळ जगणाऱ्या वाघांपैकी एक होता.असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Source ANI


SKB रेस्क्यू सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 3 वाजता राजा वाघाचा मृत्यू झाला. वृद्धापकाळामुळे राजा गेल्या काही दिवसांपासून अन्न खात नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राजाच्या मृत्यूनंतर अलीपूरद्वारचे जिल्हा दंडाधिकारी सुरेंद्र कुमार मीना, वन संचालनालयाचे अधिकारी दीपक एम आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रॉयल बंगाल टायगर राजाला श्रद्धांजली वाहिली.

Source ANI


रॉयल बंगाल टायगर म्हणून ओळखला जाणाऱ्या राजाचे वय 26 वर्षे 10 महिने 18 दिवस होते आणि त्याचा 23 ऑगस्ट रोजी त्याचा 27 वा वाढदिवस साजरा करणार होता. पण वाढदिवसाच्या 40 दिवस आधी त्याने जगाचा निरोप घेतला. राजाच्या पुढील वाढदिवसाची तयारीही वनविभागाने केली होती.

Source ANI


वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की, 2006 मध्ये राजाला सुंदरबनमधून जखमी अवस्थेत पकडण्यात आले होते. नंतर त्यांना पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले. या ठिकाणी उपचार करण्यात आले. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुंदरबनमधील माताळा नदी ओलांडत असताना राजावर मगरीने हल्ला केला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. जिल्हाधिकारी सुरेंद्र कुमार मीना यांनी सांगितले की, राजा वाघ गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याने काही दिवसांपूर्वी खाणेपिणेही बंद केले होते. राजा यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

Source by ANI

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.