जयमातृभूमी मंडळाच्या रक्तदान शिबीराला प्रचंड प्रतिसाद

मयुरेश निंभोरे , मो.- 9325250723
भुसावळ-दि-30/08/2020 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील प्रसिद्ध जय मातृभूमी मंडळाने यावर्षी शासनाच्या आदेशांचे पालन करत गणेशोत्सव सोहळा मदतोत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरविलेले होते.याचाच एक भाग म्हणून जय मातृभूमी मंडळ आणि जळगाव येथील माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.-30 आॕगस्ट रोजी सकाळी 9 ते 2 यावेळात प्रोफेसर काॕलनीतील जय मातृभूमी चौकात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. त्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेले होते.या आवाहनाला जय मातृभूमी मंडळाचे कार्यकर्ते व शहरातील भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या शिबिरात विक्रमी तब्बल 111 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला . विशेष बाब म्हणजे भुसावळ शहरात इतक्या मोठया प्रमाणावर रक्त संकलन झाल्याचे अलिकडच्या काळातील हे पहिलेच शिबीर आहे. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी जळगाव येथील गोळवलकर रक्तपेढीचे स्वयंसेवक आणि जय मातृभूमी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक किरणभाऊ कोलते, प्रशांत ऊर्फ बापूभाऊ महाजन, समाजसेवक किशोरभाऊ पाटील , अध्यक्ष किशोरभाऊ कोलते, उपाध्यक्ष सचिनभाऊ बहाटे, राजेश चौधरी, पंकज शाह , अनिरूद्ध कुलकर्णी , कल्पेश ढाके, पिंटू पाटील-बऱ्हाटे, मयुर कोल्हे ,
निलेश ब-हाटे , सोनु खुजरे, अक्षय भंगाळे, मयुर कोलते, आकाश वारके, रितेश ब-हाटे , जयेश ढाके, गोलू वारके, प्रियेश भंगाळे व जय मातृभूमी मंडळाचे इतर सर्व कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.