जळगावची समृद्धी करणार उद्या दिल्लीत NCC कॕडेटचे नेतृत्व
जळगाव – 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दिल्लीत होणाऱ्या सैन्य दलाच्या आणि एनसीसीच्या परेडकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले असते. या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांचे स्वप्न असते, केवळ या परेड मध्येच सहभागी होण्याच स्वप्न जळगावच्या समृद्धी हर्षल संत या तरुणीने पूर्ण केले असे नाही, तर संपूर्ण भारतातून या पथसंचलनात सहभागी झालेल्या 100 एनसीसी च्या तुकडीचे ती नेतृत्व करीत आहे. समृद्धी संत जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.अगदी बालपणापासून तिला एनसीसी आणि देशासाठी काम करण्याची जिद्द आणि स्वप्न होते. समृद्धीची ही कामगिरी महाराष्ट्रातील मराठी तरुणींसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट ठरलेली आहे. उद्या 26 जानेवारीच्या होणाऱ्या पथसंचलनाथ सहभागी होण्यासाठी समृद्धी ही गेल्या दोन महिन्यांपासून कसून सराव करीत आहे. उद्या तिला आपले कौशल्य दाखविण्याची सुवर्णसंधी आहे.यामुळे जळगावचे नाव देशपातळीवर गाजणार आहे.