खान्देशजळगावनिवडणूकमंत्रीमंडळ निर्णयमुंबईराजकीय
Trending

जळगावचे पालकमंत्री कोण होणार ? आ.गिरीश महाजन आणि आ.गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच

मुंबई :विधान परिषदेच्या लागलेल्या निकालानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन शिवसेनेचे तब्बल 39 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याबाहेर गेल्यानंतर राज्यात त्यांनी भाजपच्या मदतीने केलेले सत्तांतर आणी त्यानंतर काल झालेली विधानसभा अध्यक्षांची निवड या सर्व गोष्टींची चर्चा अजून थांबत नाही.तोच अनेक जिल्ह्यांमध्ये मंत्रीपदे आणि पालकमंत्री पदांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देणारे फडणवीस यांच्या समर्थक आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून यासाठी प्रत्येक आमदार आपापल्या परीने जोरदार लॉबिंग करण्यात मग्न आहे.

Advertisement by sponsered

उद्या मंत्रीमंडळ विस्तार
दरम्यान, उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याने आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीवर अंतिम निर्णय होऊन यात आता कोणाकोणाची लॉटरी लागते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. साहजिकच यात एकनाथ शिंदे गटाचे माजी जेष्ठ मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्याचे कट्टर समर्थक आणि जेष्ठ आमदार यांची नावे मंत्री पदासाठी निश्चित समजले जात आहे.


जळगावच्या पालकमंत्रीदासाठी जोरदार फिल्डिंग


जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी जामनेरचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात समजले जाणारे गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आमदार गुलाबराव पाटील या दोन माजी पालकमंत्र्यांमध्ये जोरदार रस्सीखेच असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे.दोघांच्याही मतदार संघातील समर्थकांनी काल मुंबईत विधान भवनाबाहेर शक्ती प्रदर्शन केलेलं आहे.दोघांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. दोघांनीही जळगावच्या पालकमंत्री पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्याशी यावर सखोल विचारविनिमय करून तोडगा काढण्यासाठी काथ्याकुट करीत आहे.

हे पण वाचा : एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता ?


जळगाव जिल्ह्याचा “बॉस” कोण ? या इगोमुळे हा कलगीतुरा रंगलेला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूर्वीच्या पालकमंत्र्यांना कायम ठेवण्यात अनेक ठिकाणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी विरोध दर्शविलेला आहे. दोघांनाही काल झालेल्या बैठकीत एकाच्या ऐवजी दोन पालकमंत्री पदे घ्या ,मात्र संघर्ष टाळा अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.मात्र असा पालकमंत्री पदाचा पेच अनेक जिल्ह्यांमध्ये उभा राहिलेला आहे.आगामी निवडणुका लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावच्या पालकमंत्री पदासाठी आमदार गिरीश महाजन यांची फिल्डिंग लावलेली असून यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोची झालेली आहे.माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पुन्हा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद ताब्यात घेण्यासाठी सरसावलेले आहे.आता या पेच प्रसंगावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस काय तोडगा काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यात दोघांना प्रत्येकी सव्वा सव्वा वर्षे पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे पण वाचा :

महाराष्ट्राचा ‘शॅडो मुख्यमंत्री’ (Shadow CM) कोण होणार ?

भुसावळचे आ.संजय सावकारेंना महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता

आमदार संजय सावकारे

जळगावचे माजी पालकमंत्री आणि भुसावळचे आमदार हे भाजप नेते आ.गिरीष महाजन यांचे कट्टर समर्थक मानले जातात.उद्याचा मंत्रिमंडळ शपथविधी पार पडल्यानंतर महामंडळांच्या अध्यक्षपद अथवा उपाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होणार आहे. आमदार संजय सावकारे हे अभ्यासू, शांत, संयमी स्वभावाचे आणी उच्चशिक्षित विवेकी व्यक्तीमत्व असल्याने त्यांचा मंत्रीपदाचा अनुभव पाहता त्यांना उत्तर महाराष्ट्रातून दलीत चेहरा म्हणून एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.