क्राईम

जळगावच्या माजी महापौरांच्या मुलाची निर्घृण हत्या

जळगाव – जळगाव शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी असलेल्या माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे याचा काल दि- 04/11/2020 रोजी रात्री 11. 30 वाजेच्या च्या सुमारास अज्ञात हल्लेखोर व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या केल्याची घटना घडलेली आहे.याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी अधिक माहिती घेऊन तपास करत आहे.
राकेश अशोक सपकाळे ( वय 28 ) असे या हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी कुठल्यातरी कारणावरून वाद घालून धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती मिळालेली आहे. त्याला गंभीर अवस्थेत ओम क्रिटिकल केअर सेंटर मध्ये उपचारासाठी आणण्यात आले असता डाॕक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. भर शहरात झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली असून शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढलेले आहे. तसेच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ओम क्रिटिकल केअर आणि शिवाजी नगर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.