क्राईम
जळगावात गांजाने भरलेला ट्रक पकडल्याने खळबळ


असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील खेडी गावाजवळून गांजाने भरलेला ट्रक जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विशाल सोनवणे यांना मिळाल्यानंतर त्या माहितीच्या आधारे आज सायंकाळी पोलीसांनी एमएच-42 टि-9125 या क्रमांकाच्या ट्रकचा पाठलाग केला. या ट्रकची झाडाझडती घेतली असता त्यात अंदाजे 100 ते 150 किलो पर्यंतचा गांजा आढळून आला. यानंतर ट्रक चालकास पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतलेले असून ट्रक मधून संपूर्ण गांजा ट्रकसह जप्त करण्यात आलेला आहे. ट्रकभरून गांजा सापडल्याने अलिकडच्या काळातील ही जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे. यामुळे जळगावात एकच खळबळ उडालेली आहे. या घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक डाॕ निलाभ रोहन यांनी दिलेली आहे.