क्राईम

जळगावात वहिणीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या ,दीराला अटक

जळगाव दि-21 जळगाव शहरातील पिंप्राळा भागातील मयूर कॉलनीत एका तरूणाने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना आज रात्री 10 वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात खळबळ उडालेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, योगिता मुकेश सोनार (वय 39) रा. मयूर कॉलनी , पिंप्राळा परिसर,जळगाव ही महिला आपली सासू आणि दिरासह या ठिकाणी राहते. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश सोनार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे ती महिला आपल्या आठ वर्षाच्या मुलासह दीर आणि सासूसोबत या ठिकाणी वास्तव्यास होती. दरम्यान, घरात अधूनमधून नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत होते. आज अशाच प्रकारचा वाद योगिता आणि त्यांचा दीर दीपक लोटन सोनार (वय 38) यांच्यात झाला. यामुळे संतापलेल्या दीपकने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घातले. यात त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. या घटनेमुळे परिसर हादरला असून महिलेचा दीर दीपक सोनारला रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.