आरोग्य

जळगाव कारागृहाला पालकमंत्री यांनी भेट देत घेतला आढावा

दि-04/09/2020 सतत काही ना काही कारणाने गाजत असलेल्या जळगाव कारागृहातून मगील काळामध्ये काही कैद्यांनी सिनेस्टाईल पलायन केले होते.या ठिकाणी ज्या काही अत्यावश्यक सुविधा उपलब्ध पाहिजे त्या संदर्भातील मागणी कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालक मंत्री ना.गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना केलेली होती.त्याची दखल घेत आज गुलाबराव पाटील यांनी जिल्हा कारागृहाला भेट देत पाहणी करून आढावा घेतला.या कारागृहाची क्षमता 200 असताना 400 कैदी या ठिकाणी राहतात.याठिकाणी पाण्याच्या टाकीची व्यवस्था नाही, खोल्या खराब झालेल्या आहेत. अशा बऱ्याच अडचणी या ठिकाणी आहेत. त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला या खराब झालेल्या खोल्यांचे व भिंतीचे अंदाज पत्रक तयार तात्काळ दुरूस्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी कैद्यांच्या जेवणाच्या व्यवस्थे संदर्भात लवकरच सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भुसावळ शहर हे सुद्धा जळगाव शहरा सारखेच दुय्यम दर्जाचे शहर आहे. भुसावळात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असून कैद्यांचे प्रमाण सुद्धा जास्त आहेत. त्यामुळे भुसावळात सुद्धा मोठे कारागृह बांधणे गरजेचे आहे. तसेच यासाठी लागणारा निधी व पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्यासाठी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.