अर्थकारण

जळगाव जिल्हा बँकेला “ईडी”चे पत्र आल्याने खळबळ

जळगाव – भोसरी भूखंड प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना आणि त्यांच्या परिवाराला ईडी च्या नोटीसीला सामोरे जावे लागत असतांना त्यांच्या कन्या ॲड.रोहिणीताई खडसे अध्यक्षा असलेल्या जळगाव जिल्हा बँकेने मुक्ताईनगर येथील खासगी साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या प्रकिये बाबत लेखी स्वरूपातील माहिती सक्तवसुली संचालनालयाने (इडी) ने मागीतल्याने जळगाव जिल्ह्यासह सहकार आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे.
राष्ट्रवादी प्रवेशाच्यावेळी “कोणी ईडी लावली तर आपण सीडी लावू ” अशा प्रकारचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी केले होते. या घटनेनंतर काही दिवसांनी एकनाथराव खडसे आणि त्यांच्या जावयाला ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते.या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच त्यांच्या कन्या रोहिणी खडसे अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेला सुद्धा मुक्ताईनगर येथील खासगी साखर कारखान्याला देण्यात आलेल्या कर्जा संदर्भात ईडी तर्फे माहिती देण्याच पत्र आल्याने खळबळ उडालेली आहे.
या संदर्भात जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना संपर्क केला असता त्यांच्या कडून प्रतिसाद मिळू शकलेला नाही. याबाबत बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी ईडीची नोटीस मिळालेली असल्याच्या वृत्ताच खंडन केलेले असून मुक्ताईनगर येथील खाजगी साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटपातील प्रक्रिया करताना अटी व नियमांचे पालन झालेले आहेत का ? याबाबत लेखी स्वरूपातील माहिती ईडीच्या वतीने मागविण्यात आल्याच म्हटलेलं आहे. राज्यातील 40 साखर कारखान्यांच्या कर्जवाटप व बड्या खरेदी विक्री व्यवहारांबाबत इडीने माहिती मागवलेली आहे.
या घटनेनंतर मात्र खडसे परिवारावर ईडी कडून करण्यात येत असलेल्या चौकशा पाहता जळगाव जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.