राजकीय

जळगाव जिल्हा बँकेसाठी पालकमंत्री, एकनाथराव खडसे, गिरीषभाऊ महाजनसह दिग्गज नेत्यांची बैठक सुरू

जळगाव- जिल्हा बँकेची रणधुमाळी जवळ आलेली असून मागील पंचवार्षिक निवडणूकी प्रमाणे या ही वेळी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्या संदर्भात त्यांच्या नेतृत्वाखाली आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय पॕनल बिनविरोध निवडून आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार,बँकेचे विद्यमान संचालक आणि प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू करण्यात आलेली आहे.

या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेसह,राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे,भाजप नेते गिरीषभाऊ महाजन,जिल्हा बँकेचे अध्यक्षा सौ.रोहिणीताई खडसे,बँकेचे उपाध्यक्ष किशोरआप्पा पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील, आ.शिरीष चौधरी,अनिल पाटील,चिमणराव पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डाॕ उल्हास पाटील,माजी संचालक प्रदिप देशमुख,संतोष चौधरी यांचे सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.