पालकमंत्री

जळगाव जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॕनलची कोअर कमेटी

जळगाव- जिल्हा बँकेची रणधुमाळी जवळ आलेली असून मागील पंचवार्षिक निवडणूकी प्रमाणे या ही वेळी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्या संदर्भात त्यांच्या नेतृत्वाखाली आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय पॕनल बिनविरोध निवडून आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार,बँकेचे विद्यमान संचालक आणि प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेसह, भाजप नेते गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किशोरआप्पा पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील, शिरीष चौधरी,अनिल पाटील,चिमणराव पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डाॕ उल्हास पाटील, आजी माजी संचालक व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.


आजच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीसाठी सर्व प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांनी राजकीय जोडे बाहेर काढून आठ जणांची कोअर कमिटी स्थापन केली आहे. या कमेटीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची प्रत्येकी दोन सदस्य घेण्यात आलेले आहे. मात्र जागा वाटपासंदर्भात चर्चा झालेली नाही. या बैठकीत फक्त प्राथमिक चर्चा करण्यात आलेली आहे,असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. असेच नाराजांना त्यांची नाराजी दूर करण्या साठी सर्वच नेते प्रयत्नशील असल्याची माहिती पाटील यांनी केली आहे.

बँकेच्या हितासाठी सर्वपक्षीय पॅनल आवश्यक- आ. गिरीष महाजन
माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे की जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक असून बँकेच्या हितासाठी राजकीय जोडे बाहेर काढून सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शक्यतो निवडणूक प्रक्रिया बिनविरोध व्हावी म्हणून आम्ही सर्व एकत्र बसून चर्चा केलेली आहे.मागील पाच वर्षांचा अनुभव लक्षात घेता या ही वेळी निवडणूक बिनविरोध होईल अशी मला आशा आहे.

सर्वपक्षीय पॅनल मुळे गेल्या पाच वर्षात बँकेत कामगिरी उल्लेखनीय-एकनाथ खडसे

याबाबत एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे की, मागील पंचवार्षिक निवडणुकीत मी पालकमंत्री असताना बँकेच्या हितासाठी निवडणूक प्रक्रिया म्हणून मी पुढाकार घेतला होता, आणि त्यात यश आले होते. त्याच पद्धतीने आज गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला असून त्याला सर्व प्रमुख नेत्यांनी समर्थन देऊन आठ नावांची कोअर कमिटी स्थापन करून निवडणूक प्रक्रिया बिनविरोध व्हावी, म्हणून पुढे पाऊल टाकले आहे.मात्र जागा वाटपाचा तिढा अजून कायम असून नाराजांना त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सर्व नेते प्रयत्न करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. तसेच जळगाव जिल्हा सहकारी बँक पाच वर्षांपूर्वी अडचणीत होती. तत्कालीन अनेक जिल्हा बँका अवसायनात गेलेल्या असताना मात्र जिल्हा बँकेने सर्व संचालकांच्या समन्वयातून उत्कृष्ट कामगिरी करत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे व्यवसायाचे “अ” परवाना प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे.तसेच बँकेला कोट्यवधी रुपयांचा नफा झाला असून राज्यातील इतर बँक तोट्यात गेल्याचे खडसे यांनी सांगितले आहे.तसेच जागावाटपाचा तिढा सर्वांशी चर्चेअंती व समन्वयातून निकाली काढला जाईल असेही खडसे म्हणालेले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.