जिल्हाधिकारी आदेश

जळगाव जिल्ह्यातील “या” दोन तालुक्यात कडक निर्बंध लागू होणार -जिल्हाधिकारी

जळगाव दि-11- जिल्ह्यातील चोपडा व चाळीसगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या दोन्ही नगरपालिका हद्दीत दिनांक 13 /03/2021 रात्री 00.01 वाजेपासून ते दिनांक 14/03/2021 पर्यंत रात्री 24.00 वाजेपर्यंत खालील निर्बंध लागू केलेले आहेत.
1) सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील.
2) किराणा दुकाने, Non-Essential इतर सर्व दुकाने बंद राहतील.
3) किरकोळ भाजीपाला / फळे खरेदी-विक्री केंद्रे बंद राहतील.
4) शैक्षणिक संस्था/शाळा महाविद्यालय, खाजगी कार्यालये बंद राहतील.
5) हॉटेल / रेस्टॉरंट (होम डिलीव्हरी, पार्सल वगळता) बंद राहतील.
6) सभा/ मेळावे/बैठका / धार्मिक स्थळे, सांस्कृतिक/धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.
7) शॉपींग मॉल्स / मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप बंद राहतील.
8) गार्डन, पार्क, बगीचे सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडा स्पर्धा,
प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.
9) पानटपरी, हातगाडया, उघडयावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील.
वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निबंधातून “दुध विक्री केंद्रे, वैद्यकीय उपचार व सेवा,
मेडीकल स्टोअर्स, अॅम्ब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक” यांना सुट देण्यात येत आहे. तसेच
दिनांक 13 मार्च, 2021 व दिनांक 14 मार्च, 2021 रोजी पूर्व नियोजित परिक्षा असल्यास सदर कालावधीत परिक्षार्थी व
परिक्षेकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना वर नमूद केलेल्या निर्बधातून सुट राहील.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.