शासन निर्णय

जळगाव जिल्ह्यातील “या” 12 नगरपरिषदांवर प्रशासकाची नियुक्ती

भुसावळसह बारा नगरपरिषदांची मुदत संपली

मुंबई – संपूर्ण जगभर पसरलेल्या साथरोग कोविड-१९ च्या राज्यात झालेल्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणूकांकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने व मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने मुदत समाप्त झालेल्या संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक नियुक्ती करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदी व विशेषतः अंतर्भूत केलेल्या कलम ३१७(३) मधील तरतुदीनुसार आणि सहपत्रातील तपशीलाप्रमाणे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व मुख्याधिकारी यांची आपल्या विभागातील संबंधित नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या प्रशासक पदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेशीत करण्यात आलेले आहे. यामुळे संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायतींची मुदत संपताच आदेशात नमुद केल्यानुसार संबंधित उप विभागीय अधिकारी, तहसिलदार व मुख्याधिकारी यांच्या नावाने आपल्या स्तरावरुन आदेश काढून सदर अधिकाऱ्यांना प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारण्याबाबत सूचित करावे, तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत देखील सूचित करावे. असे आदेश राज्यपालांचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री काढलेले आहेत.
यामुळे संपूर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सर्व बारा स्थानिक स्वराज्य संस्था  नगरपरिषद/नगरपंचायत यांच्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.