जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रूग्ण वाढले

जळगाव- जिल्ह्यात आज नवीन 318 कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात cघेता जनतेने आता मास्क लावणे आणि जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर 123, जळगाव ग्रामीण 9 , भुसावळ 24 ,अमळनेर 11, चोपडा 30,पाचोरा 0, भडगाव 5 ,धरणगाव 16,यावल 10 ,एरंडोल 2,जामनेर 19, रावेर 14,पारोळा 11,चाळीसगाव 24,मुक्ताईनगर 11, बोदवड 2 आणि इतर जिल्ह्यातील 7 असे एकूण 318 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.
आज दिवसभरात 135 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 56689 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 2110ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 60182 झालेली आहे. जिल्ह्यात आज 2 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1383 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.