आरोग्य

जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचा उद्रेक

जळगाव दि-29/03/2021 – जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढतच असून आज तब्बल 1205 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आता मास्क लावणे आणि जास्त खबरदारी घेणे हाच उत्तम पर्याय आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर 280, जळगाव ग्रामीण 50, भुसावळ 36, अमळनेर 93, चोपडा 392 ,पाचोरा 33 , भडगाव 63,धरणगाव 29,यावल 26,एरंडोल 20,जामनेर 61, रावेर 37, पारोळा 10,चाळीसगाव 26,मुक्ताईनगर 30, बोदवड 16 आणि इतर जिल्ह्यातील 03असे एकूण 1205 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.
आज दिवसभरात 920 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 73665 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 11426 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 86688 झालेली आहे. जिल्ह्यात आज 14 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1597 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.