आरोग्य

जळगाव जिल्ह्यात आज 1063 कोरोनाबाधीत आढळले

जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झालेले असून त्यात जिल्ह्यातील 1063 व्यक्तींचे तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आलेले आहे.
या पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 369, जळगाव ग्रामीण 84 , भुसावळ 31, अमळनेर 99, चोपडा 67, पाचोरा 46, भडगाव 31, धरणगाव 22, यावल 11 एरंडोल 77, जामनेर 50 , रावेर 19,पारोळा 17, चाळीसगाव 81, मुक्ताईनगर 25 , बोदवड 19 अन्य 15 असे एकूण 1063 कोरोनाबाधीत आज आढळून आलेले आहे . जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 30749 इतकी झालेली आहे. तसेच आतापर्यंत एकूण 21845 रूग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 849 जणांचा मृत्यू झालेला आहे. अशी माहिती आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close