आरोग्य
जळगाव जिल्ह्यात आज 571 कोरोनाबाधीत आढळले
जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झालेले असून त्यात जिल्ह्यातील 571 व्यक्तींचे तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आलेले आहे.
या पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 141, जळगाव ग्रामीण 47 , भुसावळ 28 , अमळनेर 17, चोपडा 56 , पाचोरा 14, धरणगाव 40, यावल 17 , एरंडोल 17 , जामनेर 30 , रावेर 16, पारोळा 30 , चाळीसगाव 78, मुक्ताईनगर 21 , बोदवड 00 , अन्य 10 असे एकूण 571 कोरोनाबाधीत आज आढळून आलेले आहे . जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 15972 इतकी झालेली आहे. तसेच आज 301 रूग्ण कोरोनामुक्त झालेले असून आतापर्यंत एकूण 10981 रूग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 627 जणांचा मृत्यू झालेला आहे. अशी माहिती आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.