जळगाव जिल्ह्यात आज 956 कोरोनाबाधीत आढळले

जळगाव दि-16/03/2021 – जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून आज तब्बल 956 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आता मास्क लावणे आणि जास्त खबरदारी घेणे अत्यावश्यक बनलेले आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर 341, जळगाव ग्रामीण 48, भुसावळ 117,अमळनेर 24, चोपडा 106,पाचोरा 32, भडगाव 32,धरणगाव 58,यावल 24,एरंडोल 18,जामनेर 72, रावेर 01,पारोळा 06, चाळीसगाव 46,मुक्ताईनगर 25, बोदवड 0 आणि इतर जिल्ह्यातील 06 असे एकूण 956 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.
आज दिवसभरात 709 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 63027 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 8093 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 72575 इतकी झालेली आहे. जिल्ह्यात आज 5 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1455 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.