जळगाव जिल्ह्यात आज 961 जणांची कोरोनावर मात

दि-08/09/2020 जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींचे अहवाल प्राप्त झालेले असून त्यात जिल्ह्यातील 961 व्यक्तींनी आज कोरोनावर मात केली असल्याचा अहवाल आज प्राप्त झालेला आहे. आज जिल्ह्यात 835 कोरोनाबाधीत आढळलेले असून त्यापेक्षा 126 ने जादा म्हणजेच 961 रूग्णांनी कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बातमी आज समोर आलेली आहे. तसेच या कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 113, जळगाव ग्रामीण 18 , भुसावळ 10 , अमळनेर 237, चोपडा 8, पाचोरा 66, भडगाव 40, धरणगाव 24, यावल 25, एरंडोल 67, जामनेर 32 , रावेर 16,पारोळा 255, चाळीसगाव 43, मुक्ताईनगर 5, बोदवड 00 अन्य 2 असे एकूण 961रूग्ण आज कोरोनामुक्त झालेले आहे . जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 34453 इतकी झालेली असून आतापर्यंत एकूण 24304 रूग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 894 जणांचा मृत्यू झालेला आहे. अशी माहिती आज जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.