जिल्हाधिकारी आदेश

जळगाव जिल्ह्यात “या” तारखेपासून पुन्हा निर्बंध लागू , वाचा सविस्तर

जळगाव दिः26 जून- जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या घातक अवताराने केलेली एन्ट्री या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नोडल अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संपूर्ण जळगांव जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा दिनांक
27 जून 2021 रोजी सकाळी 5 वाजेपासून पुढील आदेश येईपावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 सह विशेष निर्बंध खालील प्रमाणे लागू करीत आहे.
संचारबंदी – कोणत्याही व्यक्तीस मेडिकल ईमजन्सी शिवाय सायंकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत मुक्त संचार करण्यास मनाई राहील.
तसेच विविध बाबतीत या नव्याने लागू झालेल्या निर्बंधांबाबत संभ्रम दूर करण्यासाठी खालील दोन्ही चित्रातील कोष्टकातील आदेश सविस्तर वाचावे.

वरील आदेशाप्रमाणे लागू करण्यात आलेल्या निर्बंधातून “वैद्यकीय उपचार व सेवा, मेडीकल स्टोअर्स, अॅम्ब्युलन्स सेवा व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक” यांना सुट राहील. तसेच सदर कालावधीत पूर्व नियोजित परिक्षा असल्यास परिक्षार्थी व परिक्षेकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना वर नमूद केलेल्या निर्बधातून सुट राहील. वरील प्रमाणे जळगांव जिल्हयात लागू करण्यात आलेल्या निबंधांचे तंतोतंत पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.