जिल्हाधिकारी आदेश

जळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव दिः26- जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढती कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगांव भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संपूर्ण जळगांव जिल्हयात दिनांक 28 मार्च 2021 रोजी रात्री 00.01 वाजेपासून दिनांक 30 मार्च,2021 रोजी रात्री 24.00 वाजे पावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 सह विशेष निर्बंध खालील प्रमाणे लागू करीत आहे.
1) सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील.
2) किराणा दुकाने, Non-Essential इतर सर्व दुकाने बंद राहतील.
3) किरकोळ भाजीपाला / फळे खरेदी-विक्री केंद्रे बंद राहतील.
4) शैक्षणिक संस्था/शाळा/महाविद्यालय, खाजगी कार्यालये बंद राहतील.
5) हॉटेल / रेस्टॉरंट सेवा बंद राहतील. तथापि केवळ होम डिलीव्हरी, पार्सल सेवा सकाळी 09.00 ते रात्री
09.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
6) सभा/ मेळावे/बैठका / धार्मिक स्थळे, सांस्कृतिक/धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.
7) शॉपींग मॉल्स / मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप बंद राहतील.
8) गार्डन, पार्क, बगीचे सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडा स्पर्धा,
प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.
9) पानटपरी, हातगाडया, उघडयावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील.
10) खाजगी प्रवासी वाहतूक (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद राहतील.
11) दुध विक्री केंद्रे केवळ सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 वाजेपावेतो सुरु राहतील.
12) कायद्याव्दारे बंधनकारक असणाऱ्या पूर्व नियोजित वैधानिक सभा Online पध्दतीने घेता येतील.
13) कोविड-19 लसीकरण कार्यक्रम सुरु राहील.
14) औद्योगिक आस्थापना सुरु राहतील, तथापि संबंधितांनी ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील.
15) होळी व धुलीवंदन निमित्त कोणत्याही प्रकारे सामुहीक / सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्यास सक्त मनाई
राहील.
वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निबंधातून “वैद्यकीय उपचार व सेवा, मेडीकल स्टोअर्स, अॅम्ब्युलन्स सेवा व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक” यांना सुट राहील. तसेच सदर कालावधीत पूर्व नियोजित परिक्षा असल्यास परिक्षार्थी व परिक्षेकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना वर नमूद केलेल्या निर्बधातून सुट राहील. वरील प्रमाणे जळगांव जिल्हयात लागू करण्यात आलेल्या निबंधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.