जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम लोकसहभागातून कुंभारखेडा गावात ऑक्सिजन सिलेंडर रुमचे लोकार्पण

आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन
दि-04/08/2020 रावेर तालुक्यातील कुंभारखेडा गावातील उपग्रामीण रुग्णालयात आपत्कालीन परिस्थितीत लढण्यासाठी आणि कोरोना बाधीतांच्या उपचारासाठी लोकसहभागातून ऑक्सिजन सिलिंडर प्रणालीचे लोकार्पण उद्घाटन आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले . तर प्रमुख अतिथी म्हणून अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर , रावेर तहसीलदार सौ उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी सानिया नाकोडे हे उपस्थित होते.
तसेच उद्घाटनप्रसंगी अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण भागातील शासनाच्या आवाहनाला सकारात्मक भरभरून व तात्काळ प्रतिसाद दिल्याने त्यांनी समस्त कुंभारखेडा गावातील नागरिकांचे , प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, देणगीदार यांच्यासह संपूर्ण टिमचे अभिनंदन केले. आणि कुंभारखेडा गावाचा आदर्श जिल्ह्यातील संपूर्ण गावांनी घ्यावा, असे एक भावनिक आवाहन प्रांताधिकारी यांनी केले.
तसेच याप्रसंगी मंडळ अधिकारी संदीप जैस्वाल, अजय महाजन, तलाठी, ग्रामसेवक, श्रीकांत पाटील,पोलीस पाटील, प्रल्हाद पाटील, लोकनियुक्त सरपंच लताबाई बोंडे, उपसरपंच, गोकुळ चव्हाण, डॉ, विजया झोपे, आरोग्य सेवक बी,डी, पवार, प्रदिप पाटील, प्रविण बोंडे, सामाजिक कार्यकर्ते विलास ताठे, महेंद्र महाजन, मनोहर पाटील, प्रशांत राणे, समाधान भालेराव, नकुल पाटील, फिरोज तडवी, रविंद्र महाजन, सतिश पाटील, पिंटू अटावलकर सह आशा वर्कर, आरोग्य सेविका यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
दि,२३/७/२०२० रोजी जळगाव जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून ग्रामपंचायत स्तरावर आपत्कालीन परिस्थिती करीता ऑक्सिजन’ सिलेंडर उपलब्ध असण्याबाबतचा आदेश संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आला होता , कारण जळगाव जिल्ह्यातील सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात कोवीड-१९ या विषाणूंचा प्रादुर्भावामुळे संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, यामुळेचं कोरोना बांधित रुग्णांना श्वसनाची खूप मोठी समस्या निर्माण होते, त्यांची शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते, याकामी शासकीय यंत्रणा सतत कार्यरत आहेत,पण रूग्णांची संख्या वाढत आहे, यामुळे खेड्यातील कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे, अशी सुविधा जर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध झाली तर संशयीत रुग्ण हा शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने मृत्यू पावणार नाही, तसेच तो बाधित कोवीड सेंटर पर्यंत गंभीर परिस्थितीतही पोहोचू शकेल , परिणामी त्यांच्या जीवाचे रक्षणासाठी सुलभ होईल, व शासकीय यंत्रणेला एक प्रकारे मोठी मदत होईल, व कोणत्याही परिस्थितीत कोणीही रुग्ण तात्काळ मोठ्या दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी दगावू शकणार नाही, व परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खेड्यात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होणे अत्यावश्यक आवश्यक आहे, म्हणून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले होते, या शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद जळगाव जिल्ह्यातील कुंभारखेडा वासीयांनी दिला, तसेच कुंभारखेडा गाव हे जळगाव जिल्ह्यातील पहिलं ऑक्सिजन सिलेंडर रुम उपलब्ध युक्त असे उप ग्रामीण रुग्णालया म्हणून नावलौकिक मिळविला आहे, तसेच कुंभारखेडा गावाने जळगाव जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण करून, समाजात सहकार ते सरकार असा उत्तम आत्मनिर्भरतेचा पाया रचला आहे.