कायदे
जळगाव जिल्ह्यात 21 सप्टेंबर पर्यंत जमावबंदी आदेश

जळगाव, (जिमाका) दि. 7/9/2020 – आगामी सण व उत्सव लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याकरीता आज मध्यरात्री 12 वाजेपासून ते 21 सप्टेंबर, 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली असून तसे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील, यांनी निर्गमित केले आहे.
हे आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही. असेही अप्पर जिल्हादंडाधिकारी श्री. राहुल पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.