आरोग्य
जळगावात दुचाकीस्वारास लुटले, 9 लाख 74 हजार लंपास,
मयुरेश निंभोरे , मो.- 9325250723

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रीतम हरीभाऊ बागडे (वय ३०, रा. गेंदालाल मील परिसर, जळगाव) हा युवक जळगाव शहरातील क्विक कुरियर कार्यालयात कामाला असून या फर्मच्या माध्यमातून तो ग्राहकांना घरपोहोच रोकड रक्कम देत असतो. दुसऱ्या दिवशी ग्राहकांना देण्यासाठीची रक्कम रात्री तो नेहमी आपल्या घरी घेऊन जात असतो. या अनुषंगाने सोमवारी रात्री तो क्विक कुरियरचे संचालक जितेंद्र सोमाणी यांच्याकडून 9 लाख 74 हजार रूपयांची रोकड घेऊन तो आपल्या घरी जाण्यासाठी निघालेला असताना वाटेत शिवाजीनगर स्मशानभूमिजवळ मागून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वारांनी त्याला लाथ मारून खाली पाडले व त्याच्याकडची रोकड घेऊन पलायन केले. यावेळी भेदरलेल्या प्रितमने हल्लेखोरांना प्रतिकार करण्याचा जोरदार प्रयत्न केला परंतु त्यात याला यश आले नाही. या घटने संदर्भात रात्री जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.