क्राईम

जळगाव प्रांताधिकारी दिपमाला चौरे एसीबीच्या जाळ्यात

दि-21/08/2020 गौण खनिजकर्म अधिकारी बुलढाणा यांचेकडील गौण खनिज वाहतुकीचा परवाना असलेले दोन ट्रक एमआयडीसी परिसरात जळगाव तहसिल यांच्या पथकाने पकडून एमआयडीसी पोलिस स्टेशनला उभे केले होते. ते सोडविण्याच्या मोबदल्यात प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांच्या कडून 200000 लाखांची मागणी करण्यात आलेली होती. परंतु तडजोडीअंती 1,25,0000/रू देण्याचे ठरलेले होते. ती लाच स्विकारताना आज पंटरला रंगेहाथ अटक करण्यात आल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली आहे.
याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीवरून तक्रारदार यांचा वाळु वाहतुकीचा व्यवसाय असुन त्यांच्याकडे गौण खनिजकर्म अधिकारी बुलढाणा यांचेकडील परवाना असतांना सदर वाळु वाहतुक करणाऱ्या दोन ट्रक जळगावच्या तहसिल पथकाने एमआयडीसी परीसरात पकडून सदर ट्रक एमआयडीसी पोलीस स्टेशनला उभे केले होते. संबंधीत ट्रक सोडण्याच्या मोबदल्यात प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या वतीने लिपीक अतुल अरूण सानप यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 2,00,000/- रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 1,25,000/रुपये लाचेची मागणी करण्यात आली. दरम्यान या संदर्भात तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली.
या अनुषंगाने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सापळा रचून लिपीक सानप यांच्या खाजगी पंटरने स्वीकारली. याचवेळी त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव परीसरात करण्यात आली. या प्रकरणी श्रीमती दिपमाला जयपाल चौरे, (वय-३६ उपविभागीय अधिकारी जळगाव भाग, रा-सागरपार्क समोर, रामेश्वर शासकीय निवासस्थान, जळगाव) आणि अतुल अरुण सानप, (वय-३२, लिपीक, उपविभागीय अधिकारी कार्यालय,जळगाव भाग, रा-महाजन नगर, दत्त मंदीराजवळ,मेहरुण) यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात सध्या तरी पंटर आणि संबंधीत लिपीक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. तर प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांना मात्र अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नसल्याची माहिती मिळालेली आहे.सदरील कारवाई सुनिल कडासने पोलिस अधिक्षक ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव पो.हे.काॕ. अशोक अहिरे पो.ना. मनोज जोशी पो.ना.सुनिल शिरसाठ यांच्या पथकाने केली. पुढील तपास पो.नि.संजोग बच्छाव पोलिस निरीक्षक ला.प्र.वि.जळगाव हे करीत आहे.
Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.