राजकीय

जळगाव महापालिकेतील गैरव्यवहाराची तक्रार करणार- एकनाथराव खडसे

जळगाव- जळगाव महापालिकेतील वॉटर ग्रेस आणि सफाई कामाचा मक्ता यामध्ये गैरव्यवहार आणि अनियमितता असल्याची माहिती मिळालेली आहे.सदरील भ्रष्टाचाराच्या पुराव्याची कागदपत्रे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी माझ्याकडे आणून दिलेली आहे. यासंदर्भात मी पुराव्यांची खात्री करून राज्यशासनाकडे तक्रार करणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी आज दिलेली आहे. तसेच जळगाव महापालिका निवडणुकीच्या वेळी जळगाव शहरात काही ठिकाणी मी प्रचार सभा घेतल्या होत्या , आणि त्या प्रचार सभांमध्ये मी सांगितले होते की जर सत्ताधारी पक्ष नागरी सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले तर त्यांना सर्वात आधी मीच जाब विचारेल आणि आता तो जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. जळगाव शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी मला प्राप्त झालेल्या असून त्या संदर्भातील चौकशी करण्यासाठी मी राज्य शासनाकडे दाद मागणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलेली आहे.

मनिष जैन यांनी भेट घेतल्याने तर्कवितर्क

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अनेक राजकीय समीकरणे बदलली असून एकेकाळी कट्टर राजकीय विरोधक असलेले ईश्वरलाल जैन यांचे सुपुत्र माजी आ.मनिष जैन यांनी आज एकनाथराव खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडालेली आहे. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती अद्याप अस्पष्ट असून ही भेट येणाऱ्या काळातील निवडणूकांमध्ये मोठा उलटफेर करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.