जळगाव शहरात पुन्हा एका तरूणाची निर्घृण हत्या

.
जळगाव – दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरात माजी महापौराच्या मुलाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा शिवाजीनगर भागात इंद्रप्रस्थ नगर परिसरातील खडकेचाळ जवळ एका 25 वर्षीय तरुणाचा अज्ञात हल्लेखोरांनी काल रात्री 11.30 वाजेच्या सुमारास धारदार शस्त्रांनी भोसकून हत्या केल्याने जळगाव शहरात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडालेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की भूषण भरत सोनवणे ( वय 25 ) रा. इंद्रप्रस्थ नगर , जळगाव परिसरातील हरिओम शांती नगर येथील रहिवासी आज रात्री 11.30 वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असताना त्याचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली असून तणावाचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी ,सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री कुमार चिंथा तसेच शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत.