आंतरराष्ट्रीय

जागतिक बँकेने भारताला केली 500 दशलक्ष डाॕलरची मदत

नवीदिल्ली (वृत्त संस्था) दि-02
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या (World Bank) संचालक मंडळाने भारताला 500 दशलक्ष डॉलरच्या मदतीची घोषणा केलेली आहे. संपूर्ण देशात साथीच्या रोगाचे थैमान लक्षात घेता किंवा देशातील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता तसेच हवामानाचा धोका आणि आपत्ती निवारणासाठी ही मदत जाहीर केली असल्याचे समजते.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि सर्वच राज्य सरकारांवर नाराजी व्यक्त केली होती की कोरोनामुळे त्रस्त असणार्‍या असंघटित क्षेत्रातील स्थलांतरित कामगार व मजुरांना मदत करण्यास आपण अपयशी ठरत आहोत आणि आज एक दिवसानंतर लगेचच जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने 500 दशलक्ष डॉलर्सच्या कार्यक्रमास मान्यता दिली असल्यामुळे भारताला ही खूप मोठी मदत मनाली जात आहे.
जागतिक बँकेच्या या मदतीचा कार्यक्रम कॉर्डिनेटेड अँड रिस्पॉन्सिव्ह इंडियन सोशल प्रोटेक्शन सिस्टम (CRISPS) या नावाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनांना पाठिंबा देण्यासाठी 1.15 अब्ज डॉलर्सच्या भारताच्या कोविड -19 सामाजिक संरक्षण कार्यक्रमास प्रतिसाद देणार आहे.
ही मदत ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना सारखे हॉटस्पॉट बनले आहेत तसेच आपत्ती निवारण निधी वर्तमानकाळातील महामारीच्या आणि भविष्यातील कोणत्याही लहरींच्या राज्यांना समर्थन देईल. शहरी भागात सामाजिक संरक्षण कव्हरेज अधिक सखोल करण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे सरकारी योजनेला बळकटी मिळेल. याबाबत ANI या वृत्तसंस्थेने ट्विट केलेले आहे.
Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.