औरंगाबादठाणेपोलिस प्रशासनमंत्रीमंडळ निर्णयमुंबईशासन निर्णय
जाता जाता उद्धव ठाकरेंनी लगावले चार “मास्टर स्ट्रोक”, दीर्घकाळ प्रलंबित गुंतागुंतीच्या विषयांना दिली मंजूरी

जाता जाता उद्धव ठाकरेंनी लगावले चार “मास्टर स्ट्रोक”, दीर्घकाळ प्रलंबित गुंतागुंतीच्या विषयांना दिली मंजूरी
औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.


मुंबईचे नवे पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर यांची नियुक्ती
एकीकडे राज्यात सत्तासंघर्षाच्या खेळादरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) हे आज निवृत्त होत आहे.
काल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक पार पडली.त्यात मुंबई पोलीस आयुक्तपदी (Mumbai Police Commissinor) विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांची नियुक्ती केलेली आहे. विवेक फणसळकर हे उद्धव ठाकरेंच्या मर्जीतील अधिकारी असल्याचे बोलले जाते. याआधी ते ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.
1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, फणसळकर मुंबई सीपी म्हणून नियुक्तीपूर्वी पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे डीजी आणि एमडी म्हणून काम करत होते.2018 मध्ये, विवेक फणसळकर यांची परमबीर सिंग यांच्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, ज्यांची नंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली होती.
नवी मुंबईतील विमानतळाचे नामकरण लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय करण्यास मान्यता
