जामनेर तालुक्यातील पळासखेडे कोव्हिड सेंटरमधून 15 रूग्ण फरार

जामनेर – जामनेर येथून जवळच असलेल्या पळासखेडा येथील कोविड क्वाॕरंटाईन सेंटर मधून 15 कोरोना बाधित रुग्ण फरार झालेले असून त्यांच्या विरुद्ध साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 चे उल्लंघन केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने डोके वर काढलेले असतांना जामनेर येथून जवळ असलेल्या पळासखेडा येथील कोविड क्वाॕरंटाईन सेंटर मधून चक्क 15 जण फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडालेली आहे.
याबाबत यै येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे यांनी कोव्हिड क्वाॕरंटाईन सेंटर मधून 15 जण पळाले असल्याच्या घटनेला दुजोरा दिलेला असून पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, पळालेल्या काही रुग्णांनी माझ्याशी संपर्क केलेला असून ते क्वाॕरंटाईन सेंटरला परत येत असल्याचं सांगितलेले आहे. तर इतरांशी आम्ही संपर्क करत आहोत. या सर्वाना परत आणण्यासाठी काम सुरु असल्याची माहिती डाॕ सोनवणे यांनी दिलेली आहे.