क्राईम

जिल्हा परिषदेचा वरिष्ठ लिपीक ACB च्या जाळ्यात अडकला

जळगाव : जळगाव जिल्हा परीषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील वरीष्ठ लिपिक योगेश खोडपे यांना दोन लाख
30 हजारांच्या लाच मागणीप्ररकणी जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सकाळी अटक केल्याने जिल्हा परिषदेतील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडालेली आहे.
तक्रारदाराच्या भावाला शिक्षण विभागात नोकरीसाठी मंजूरी मिळवून देण्यासाठी ही लाच काही महिन्यांपूर्वी मागण्यात आली मात्र आरोपीला संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणी एसीबीच्या अहवालात सिद्ध झाल्याने आरोपीला आज दुपारी अटक करण्यात आलेली आहे.

लाच मागणी महागात पडली
जळगावातील 35 वर्षीय तक्रारदार यांचा लहान भाऊ जळगावच्या आर.आर. विद्यालयात 2014 पासून शिक्षक या पदावर विनाअनुदानीत तत्वावर कार्यरत आहे. त्यांचे विनाअनुदानीत तत्वावरुन अनुदानीत तत्वावर शिक्षण सेवकपदी नियुक्तीस मान्यता देण्याबाबतचा अनुकूल अहवाल तयार करून पाठविण्याच्या मोबदल्यात यातील लोकसेवकांनी तक्रारदार यांच्याकडे 12 फेब्रुवारी 2021 रोजी पंचांसमक्ष लाच मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली मात्र आरोपीला संशय आल्यानंतर त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र एसीबीला लाच मागणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी सकाळीच आरोपी योगेश खोडपे यांना अटक करण्यात आली. आरोपीविरोधात गुरुवारी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

यांच्या पथकाने आवळल्या आरोपीच्या मुसक्या
सदरील कारवाई ही नाशिक क्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अप्पर अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस. पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहा.फौजदार दिनेशसिंग पाटील, सहा.फौजदार सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलीस नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलीस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबलमहेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने केली.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.