जिल्हा परिषद सदस्या पल्लवीताई सावकारेंचे नाव मतदार यादीतून गायब

भुसावळ- आज दिनांक 15 जानेवारी रोजी तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. येथील जिल्हा परिषद सदस्या सौ.पल्लवीताई प्रमोद सावकारे यांचे मतदान या गावात आहे. पण आज मतदार याद्या पाहिल्या असता मतदार यादीत त्यांचे नावच नसल्यामुळे पल्लवी सावकारे यांना चांगलाच धक्का बसला. यामागे प्रशासनाचा गलथानपणा आहे की, विरोधकांनी प्रशासनाला हाताशी धरून माझे नाव गायब केले? असा आरोप जि.प. सदस्या पल्लवीताई सावकारे यांनी केला आहे. .
अंतिम प्रारूप यादी मध्ये पल्लवीताई सावकारे यांनी त्यांचे नाव असल्याची खात्री करून घेतली होती. याद्या प्रकाशित करण्यामध्ये जाणूनबुजून नाव गायब करण्यात आले आहे.असा आरोप सावकारे यांनी केला आहे.
यापूर्वी 2017 साली जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूक, एप्रिल 2019 मध्ये लोकसभा व ऑक्टोबर 2019 मधील विधानसभा निवडणुकीमध्ये मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.मी स्वतः जिल्हा परिषद सदस्या असून माझे नाव जर अशा प्रकारे गायब केले गेले असेल तर तालुक्यात अशा आणखी किती लोकांची नावे मतदार यादीतून वगळली गेली आहेत, याचा शोध घेऊन निवडणूक आयोगाकडे मी तक्रार करणार आहेत. याघटने बाबत वेळ पडल्यास उच्च न्यायालयात तक्रार दाखल करू अशी प्रतिक्रिया पल्लवीताई सावकारे यांनी दिली आहे.