राजकीय

जिल्हा बँक रणसंग्राम ! सर्वपक्षीय पॕनलचा होणार “करेक्ट कार्यक्रम”,एकनाथराव खडसे सकारात्मक

मुक्ताईनगर – काही लोक आपल्या कुवतीनुसार बोलत असतात, ओझरखेडा धरणा बाबत कोणी काय बोलले, याकडे मी लक्ष देत नाही, शेतकऱ्यांना पाणी कसे मिळेल याकडे आपला कटाक्ष आहे. मंत्र्यांला शिव्या द्यायच्या, त्यांच्यात कुवत नाही असे म्हणायचे, मंत्र्यांवर टीका टिप्पणी करायची, त्यामुळे मंत्री तुमची काम कसे करणार ? तुम्हाला सहकार्य कसे कळणार असा टोला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबत आंदोलन करणाऱ्यांना लगावलेला आहे.

 तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची ओझरखेडा धरणातून पाण्याचे आवर्तन मिळावे, अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मी पालकमंत्री असतानाच्या काळात या ओझरखेडा धरणाला मंजूरी मिळून त्याचे बांधकाम झालेले असून, हतनूर धरणातून वाहून जाणारे पाणी ओझरखेडा धरणात सोडून त्यातून वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेसाठी आणि वीज मंडळासाठी आवर्तन सोडण्याचा करार झालेला आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे आरक्षण रखडले असून याबाबत रोहिणीताई खडसे यांनी मागील काही दिवसांपूर्वी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची या विषयावर भेट घेऊन धरणातून पाणी मिळण्याची मागणी केली होती. आणि त्यानंतर जयंत पाटील यांनी रोहीणीताई खडसेंच्या उपस्थितीत याबाबत बैठक घेतली आणि जयंत पाटील यांनी सांगितले की या धरणातून बाराही महिने पाणी देता येणार नाही परंतु आठ महिने पाणी मात्र नक्की येईल. त्यानुसार येत्या दोन सप्टेंबर पासून यातील सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे तसेच वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजना, बोदवड उपसा सिंचन योजना, कुर्हा-वढोदा उपसा सिंचन योजना, मुक्ताईनगर उपसा सिंचन योजना या सर्व योजनांच्या कामांना गती देऊन निधीची उपलब्धता करून देणार असल्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिलेली आहे.
दरम्यान जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज सर्वपक्षीय पॅनल अस्तित्वात असून यापुढेही सर्वपक्षीय पॅनल मिळून सत्तास्थापन करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेऊन व अन्य संचालकांनी माझी मुंबईत भेट घेतलेली आहे.त्यांच्या मागणीला मी सकारात्मक असून याबाबत येत्या 30 तारखेला सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.बँकेच्या विद्यमान अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या नेतृत्वात बँकेने गेल्या पाच वर्षात चांगली कामगिरी केली आहे.असेही खडसे म्हणालेले आहे.
Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.