जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करून त्यांच्यावर मोक्का लावा -जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

जळगाव – जळगांव जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील हे जळगांव जिल्हा दौऱ्यावर आले असतांना त्यांनी देखिल संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना. गुलाबराव पाटील यांनी देखिल संबंधितांवर कडक कार्यवाही करत संबंधितांवर मोक्का लावण्यात यावा असे सांगितलेले आहे.
तसेच मुक्ताईनगर तालुक्यात देखिल चांगदेव, चिंचोल, मेहुण, अंतुर्ली, कुर्हा काकोडा या परिसरात पत्त्यांचे क्लब जोरात सुरु झालेले आहेत. ते देखिल बंद करण्यात यावेत. काल बोदवड येथे झालेल्या नगरपंचायत निवडणुकिमध्ये प्रभाग क्र 14 मध्ये शिवसेनेचे उमेदवार शेख ईसराईल असलम, शेख असलम चिकनवाले व मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याची माहिती या प्रभागातील उमेदवार जाफर शेख यांनी रोहिणी ताई खडसे यांना दिली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली पोलिसांनी लाठीचार्ज केला रोहिणीताई खडसे यांना देखील धक्काबुक्की’ झाली. त्यानंतर रोहिणीताई खडसे यांनी पोलिस निरिक्षक यांना माहिती देऊन बोलविले व गर्दिवर नियंत्रण केले गेले असल्याची माहिती निवेदनात नमूद केलेली आहे. रोहिणीताई खडसे यांनी अॅड. भैयासाहेब यांना देखील याबाबत माहिती दिली. अॅड. भैयासाहेब तेथे गेले असता मुक्ताईनगर येथील छोटु भोई, वरणगाव येथील समाधान महाजन हे भैयासाहेब यांच्या अंगावर धावुन येत आमच्या मतदारसंघात तुम्ही काय करताय? असे स्पष्ट भाष्य करत वाद केला. या निवेदनात पुढे म्हटलेल आहे की, छोटू भोई यांचा पूर्णाड फाट्यावर पत्त्यांचा क्लब असून अवैध दारू विक्रीचा सुद्धा धंदा आहे. मध्यप्रदेश आरटिओ बॕरियल जवळ रात्री हप्ते वसुली करत असतात,याचा ट्रकचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. तसेच मुक्ताईनगरकडून बोदवडकडे जात असताना नवीन मुक्ताईमंदिरा जवळ पानटपऱ्यांवर देखील अवैधपणे दारू विक्री केली जाते.येथील महिलांना या भागात पायी फिरताना असुरक्षितता वाटते. तरी या सर्व अतिक्रमित व अवैध धंधेवाईकांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांना दिलेले आहे.