जिल्ह्यातील पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव दि-27/08/2020 जळगाव जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे केळी पिकावर कुक्कुंबर मोझॅक व्हायरसमुळे केळी पिकांचे नुकसान झालेले होते. यावेळी लागलीच नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर जात आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांनी पाहणी करत कृषीमंत्री दादा भूसे साहेब यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करीत नुकसानीबाबत कळविले होते. यांवर मदतीचे आश्वासन कृृषीमंत्र्यांनी दिले होते. यानंतर आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राउत यांना दिनांक २५ रोजी पत्र देत नुकसानिचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमिवर ; पालकमंत्री भाऊसो. गुलाबरावजी पाटिल यांना पत्र देत आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांच्या ऊपस्थितीत जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्याशी दिनांक २६ रोजी चर्चा केली होती. यानंतर आजरोजी दिनांक २७ रोजीच्या बैठकीत जिल्हाधिकार्यांनी संपूर्ण जिल्हयात झालेल्या नुकसानीबाबत ३ सप्टेंबर पर्यंत पंचनामे पुर्ण करण्याचे आदेश दिले.त्यानंतर बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी कृषीमंत्री दादा भुसे व कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासोबत चर्चा करून ही मागणी केली. त्यानुसार कृषिमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यातील मूग, उडीद , अन्य खरीप पिके तसेच नुकसान झालेल्या केळी पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांना फोनद्वारे पंचनाम्याचे निर्देश दिले.आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या दिनांक २५ रोजीच्या पत्रात नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करुन भरपाई मिळण्यासाठी दिलेल्या पत्रातील काही मुद्दे- जिल्ह्यात केळी पिकाची लागवड जास्त प्रमाणात असून केळी पिकावर कुक्कूंबर मोझँक व्हायरस सीएमव्ही या आजाराने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे केळी या पिकासाठी टिशू कल्चर तंत्रज्ञानातून तयार केलेले केळीचे रोप हे निरोगी सशक्ती आणि रोगप्रतिकारक क्षमता जास्त असल्याचे मानक तेच करुन दिले जातात. किंबहुना त्याचमूळे टिशू कल्चर पद्धतीमूळे तयार केलेल्या रोपांची किंमत बाजारात जास्त असते. अशावेळी कूठल्याही रोगाला बळी न पडता चांगले उत्पादन व उत्पन्न देण्याची हमी एक प्रकारे टिशू कल्चर तंत्रज्ञान वापरून रोपे तयार करुन विकणाऱ्या कंपन्यांची असते. परंतु सध्याच्या मृग हंगामात लागवड केलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे जसे कि जैन टिशू कल्चर , रेवा टिशू कल्चर या कंपन्यांचे रोपांवर खूप मोठ्या प्रमाणावर कुकुंबर मोझँक व्हायरस नावाचा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. कंपन्यांकडून शेतकऱ्यांना शिफारस केल्या गेलेल्या किटकनाशक तसेच बुरशीनाशक यांची फवारणी करुन सुद्धा रोग आटोक्यात आलेला नाही. लागवडीपासून आज तिन महिने होईपर्यंत शेतकऱ्यांचे केळीच्या एका खोडामागे जवळजवळ पंचेचाळीस रुपये पर्यंत खर्च झालेला आहे. एवढा खर्च करुनही केळीची हि नविन लागवड केलेली संपूर्ण बाग ऊपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. तरी तात्काळ सदरील केळी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेस देण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे अहवाल शासनाकडे पाठवून नुकसान त्वरित भरपाई मिळावी.