महाराष्ट्र

हतनुर धरणाचे 24 दरवाजे 1.50 मीटरने उघडले,तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच उघडले 24 दरवाजे

जळगाव दि-14 खान्देशातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने हतनुर धरणाचे रात्री 7 वाजेच्या सुमारास तब्बल 24 दरवाजे 1.50 मीटरने उघडण्यात आलेले असून त्यातून तब्बल 2136.00 क्युमेक्स अर्थात 75,433 क्युसेक्स इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग तापी नदीत पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदी ही दुथडी भरून वाहत असून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पाण्याचा प्रवाह हा खूप वेगवान असल्याने पुढील काही दिवस कोणीही तापी नदीकाठी गुरे ढोरे अथवा अन्य कामासाठी जाऊ नये असे आवाहन जळगाव जिल्हा प्रशासनाने केलेले आहे.
यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आल्याने परिसरातील पाटचार्‍यांमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावला असल्याचे दिसून येत आहे. काल आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने हतनूर धरणाचे वाहून जाणारे पाणी हे जवळच्या ओझरखेडा धरणात सोडण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button