आरोग्य
जिल्ह्यात हाॕटेल्समधून अन्नपदार्थांच्या पार्सलची मुभा- जिल्हाधिकारी

जळगाव -दि-06/09/2020 महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या नवीन नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्यातील हॉटेल्स उपाहारगृह त्यांना पार्सलद्वारे अन्नपदार्थ विक्री करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. हॉटेल उपहारगृह सुरू करण्यात आलेली असली तरीही त्यातून फक्त पार्सलद्वारे अन्नपदार्थ देण्याची मुभा राहील. त्या ठिकाणी थांबून जेवण करण्याची परवानगी असणार नाही. जिल्ह्यातील हॉटेल्स, उपहारगृहे यांची प्रशासनामार्फत वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिक हॉटेल व उपाहारगृहे चालक-मालक यांनी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहील. नियमावलीचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध तसेच अफवा पसरविणाऱ्यांविरोधात साथरोग प्रतिबंधक अधिनियमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे आदेश आज जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत यांनी दिलेले आहेत.