जिल्हाधिकारी आदेश

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्ह्यात 24 हजार म्युकरमायकोसिस रूग्णांवर उपचार योजनेत होणार मोफत उपचार- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत 996 प्रकारच्या पध्दतीवर उपचार केले जातात. शासनाने या योजनेची व्याप्ती वाढवून आता पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांसोबत मर्यादित कालावधीसाठी पांढरे रेशन कार्डधारकांसाठी ही योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात कोविड-19 या आजाराच्या 4 हजार 19 रुग्णांवर तर 20 हजार 29 नॉनकोविड रुग्णांवर उपचार केले आहेत. अशी माहिती डॉ. गोपाल जोशी, जिल्हा समन्वयक, राज्य आरोग्य हमी सोसायटी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
            सद्यस्थितीत कोविड साथरोग परिस्थितीमध्ये कोविड-19 च्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची (Mucormycosis) लक्षणे आढळून येत आहेत. म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचाराकरिता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये सर्जिकल पॅकेजेस 11 व मेडिकल पॅकेजेस 8 मध्ये उपचाराची मुभा शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत प्रति कुटुंब, प्रति वर्षी दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण आहे. म्युकरमायकोसिस या आजारासाठी विमा संरक्षणापेक्षा अधिकचा खर्च आल्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्वावर अधिकचा खर्च भागविण्यात येणार असल्याचेही डॉ. जोशी यांनी म्हटले आहे.
            म्युकरमायकोसिस या आजारातील उपचारामध्ये Antifungal औषधे हा महत्वाचा भाग आहे. संबधित औषधे कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सदरची औषधे महागडी आहेत. जळगाव जिल्ह्यात ही औषधे (अॅफोटेरीसीन बी) शासनाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत अंगीकृत रुग्णालयात पात्र लाभार्थीस शासनाकडून मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचारासाठी लागणारी बहुआयामी विशेष सेवा, या योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव आणि डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपलब्ध आहेत.
            या योजनेतंर्गत उपचार घेण्यासाठी रुग्णाचे रेशन कार्ड व आधार कार्ड रुग्णालयात उपस्थित असणाऱ्या आरोग्य मित्राकडे देणे आवश्यक असून या योजने अंतर्गत म्युकरमायकोसिसवर उपचार पूर्णपणे मोफत करण्यात येतो. जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा.  असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले आहे.

म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळणाऱ्या व बाधित झालेल्या रुगांवर उपचार करण्यासाठी खाजगी रुगणालयात पुरेशा सोयीसुविधा तसेच तज्ञ डॉक्टर असेल तरच या रुग्णालयांना उपचाराकरीता Amphotericin B इंजेक्शनचे वितरण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या असून तसे परिपत्रक निर्गमित केले आहे.
            जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळणाऱ्या व बाधित झालेल्या रुग्णांवर काही खाजगी रुग्णालयात डॉक्टर तात्पुरत्या स्वरुपाचे उपचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी काही सुचना निर्गमित केल्या आहेत. यात ज्या रुग्णालयात म्युकरमायकोसीस आजारावर उपचार अथवा रुग्ण दाखल केले जातात. अशा रुग्णालयांमध्ये कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर, Opthalmologist, सर्जन (Oral Surgen) यांच्या सुविधा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनास व जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळविणे आवश्यक राहील. या रुग्णांलयामध्ये शस्त्रक्रिया (Surgical procedure) च्या बाबतीत Debridement, Enucleation करण्याच्या पुरेशा सोसी उपलब्ध असणे अपेक्षित आहे.
            या बाबींची पुर्तता करणाऱ्या रुग्णालयांनाच उपचाराकरीता जिल्हा शल्य चिकित्सक Amphotericin B इंजेक्शनचे वितरण करतील याची सर्व रुग्णालयांनी नोंद घ्यावी. या सुचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम नुसार कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी कळविले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.