राजकीय

जि.प.सदस्या पल्लवीताई सावकारे यांची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार

भुसावळ- आज दिनांक 15 जानेवारी रोजी तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. येथील जिल्हा परिषद सदस्या सौ.पल्लवीताई प्रमोद सावकारे यांचे मतदान या गावात आहे. त्या कुऱ्हा-वराडसीम जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या आहेत. पण आज मतदार याद्या पाहिल्या असता मतदार यादीत त्यांचे नावच नसल्यामुळे पल्लवी सावकारे यांना चांगलाच धक्का बसला. त्यामुळे त्यांना मतदानाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागलेले आहे. यामागे प्रशासनाचा गलथानपणा आहे की, विरोधकांनी प्रशासनाला हाताशी धरून माझे नाव गायब केले? असा आरोप जि.प. सदस्या पल्लवीताई सावकारे यांनी केला आहे.
अंतिम प्रारूप यादी मध्ये पल्लवीताई सावकारे यांनी त्यांचे नाव असल्याची खात्री करून घेतली होती. याद्या प्रकाशित करण्यामध्ये जाणीवपूर्वक नाव गायब करण्यात आलेले आहे. असा आरोप पल्लवी सावकारे यांनी केला आहे.
यापूर्वी 2017 साली जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूक, एप्रिल 2019 मध्ये लोकसभा व ऑक्टोबर 2019 मधील विधानसभा निवडणुकीमध्ये मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मी स्वतः जिल्हा परिषद सदस्या असून माझ्या गटातील गृप ग्रामपंचायत वांजोळा येथील मिरगव्हाण येथील भिल वस्तीमधील पुढील प्र नावे सुद्धा मतदान यादीतून वगळण्यात आलेली आहे.
१. विश्वनाथ कृष्णा भिल
२. शांताराम कृष्णा भिल
३. वैशाली विश्वनाथ भिल
४. आरती लिलाधर भिल
या संपुर्ण कटुंबासहीत सुमारे १५ जणाची नांवे गायब झालेली आहेत. मला मतदानाच्या हक्कापासुन वंचीत राहावे लागले आहे. याची आपण दखल घेऊन संबंधित सर्व दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी.अशी विनंती जि.प. सदस्या पल्लवीताई सावकारे यांनी राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.