जुगार अड्ड्यावर धाड, 2,33,650 रू.चा मुद्देमाल जप्त

मयुरेश निंभोरे , मो.- 9325250723
पाचोरा- दि.08/08/2020 रोजी सातगाव (डोंगरी) ता.पाचोरा या गावी खडकी नदिच्या काठी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भरलेल्या जुगाराचा अड्ड्यावर पोलिस पथकाने धाड टाकून सहा आरोपींसह एकूण रू.233650 मात्र , अक्षरी रक्कम रू.दोन लाख तेहेतीस हजार सहाशे पन्नास मात्र ,एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मिळालेल्या गुप्त माहिती वरून सहाय्यक पोलिस निरीक्षिका निता कायटे तसेच पोहेका/2658 रणजित पाटील, पोका/990 संदिप राजपूत, पोका/3217 ज्ञानेश्वर बोडखे, मपोका/2527 माधुरी शिंपी यांच्या पथकाने सातगाव (डोंगरी) गावी खडकी नदिच्या काठी चालू असलेल्या पत्त्याच्या डावावर टाकलेल्या छाप्यात 1) मधुकर शंकर पाटील ,(2) एकनाथ भिमराव पाटील ,(3) राजू हसन तडवी (फरार आरोपी), (4) प्रकाश शिवराज पाटील , (5) बाळू उगलाल निकम ,(6) रविंद्र सुनिल चौधरी या सहा संशयीताना जुगार खेळताना अटक करण्यात आलेली असून यांच्या कडून रोख रक्कम रू तीन हजार सहाशे पन्नास मात्र आणि सात मोटर सायकली अंदाजे किंमत रू.230000 मात्र असा एकूण
रू.233650/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या नमुद सहा आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे