Crime

जुन्या नोटा बदलून देतो सांगत 67 लाखांचा चुना,तर तोतया पोलिसांनी सुद्धा टाकली धाड,7 लाख लुटले

ठाणे दि-13 चलनातून बाद झालेल्या 500 व 1000 च्या जुन्या नोटा बदलून देण्याचे अमिष दाखवून सहा भामट्यांनी उल्हासनगरातील एका व्यापाऱ्याला तब्बल ६७ लाख रूपयांचा चुना लावला आहे. धक्कादायक म्हणजे एकीकडे नोटा बदलण्यासाठी दलाली मिळवत असतानाच दुसरीकडे हाच व्यवहार तोतया पोलिसांच्या मदतीने धाड टाकून रंगेहाथ पकडवून पुन्हा संबंधित व्यक्तीकडून पैसे उकळल्याचे समोर आलेलं आहे. तब्बल पाच कोटी रूपयांच्या जुन्या नोटा बदलण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. केंद्र सरकारने 9 नोव्हेंबर 2016 रोजी चलनातील 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा चलनातून बाद केलेल्या होत्या. मात्र अस्तित्वात असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी काही काळ मुदतही दिली. ही मुदत संपल्यानंतर अनेक ठिकाणी जुन्या नोटांचे घबाड सापडले. जुन्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया रिझर्व बँक ऑफ इंडियाने आता जवळपास बंद केलेली आहे. मात्र त्यानंतरही जुना नोटा बदलून देण्याचे अमिष दाखवून उल्हासनगरातील एका व्यक्तीला सहा जणांनी तब्बल 67 लाखांचा चुना लावला आहे.मनोहरसिंग प्रकाश ठाकुर (वय 30) असे या तक्रारदार व्यापाऱ्याचे नाव असून त्यांच्या परिचयाच्या कपिल कथोरे या व्यक्तीने जुगाड करून जुन्या नोटा बदलून देण्याचे आश्वासन ठाकूर यांना दिले होते.1कोटीच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी संबंधितांना 12 लाख द्यावे लागतात. तर 1 कोटी रूपये बँकेतून बदलून घेतल्यास आपल्याला एक कोटीच्या बदल्यात 20 लाख रूपये बँकेकडून मिळतात. मात्र या प्रक्रियेतील काही व्यक्तींना 5 लाख रूपये दयावे लागतील. तर उर्वरित उर्वरीत 15 लाख रूपये ठाकूर यांना मिळतील असे आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे आरोपीनीं ठाकूर यांचा विश्वास संपादन करून त्यांना पाच कोटी रूपयांच्या जुन्या नोटा देण्यासाठी वेळोवेळी तब्बल 60 लाख रूपये घेतले.तसेच अनिल रामचंदानी, नितीन बनसोडे, संजय कमलाकर सावंत उर्फ भाऊ, कपील कथोरे, त्याचा भाऊ आणि इम्रान खान यांनी फिर्यादी यांना 5 कोटी बदलून देतो असे सांगुन ठाकूर यांना एकदा उल्हासनगरच्या कॅम्प दोन भागातील गोल मैदान येथे पैसे आणण्यास सांगितले. त्याचवेळी तेथे तोतया पोलिसांना बोलावून पाच कोटी रूपयाच्या जुन्या नोटा जवळ बाळगल्या म्हणून ठाकूर यांना रंगेहाथ पकडल्याचा बनाव करून पुन्हा 7 लाख रूपये उकळले. त्यामुळे पाच कोटी रूपये बदलण्याच्या प्रक्रियेत तक्रारदार ठाकूर यांना या 6 भामट्यांनी 67 लाख 50 हजार रूपयांचा चुना लावला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठाकूर यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अखेर कपील कथोरे, त्याचा भाऊ, अनिल रामचंदानी, नितीन बनसोडे, संजय कमलाकर सावंत उर्फ भाऊ आणि इम्रान खान अशा सहा जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एवढे वर्ष पाच कोटींच्या चलनातून बाद झालेल्या 500 व 1000 च्या जुन्या चलनी नोटा बाळगल्याप्रकरणी आता तक्रारदार मनोहरसिंग ठाकूर हा सुद्धा आयकर विभागाच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.