ट्रक चालकाचा खून करून, ट्रकसह 6 लाखांचा ऐवज लंपास

मयुरेश निंभोरे मो.-9325250723
पारोळा -पारोळा तालुक्यातील करंजी परिसरात दिनांक सात ऑगस्टच्या रात्री रस्त्यालगत एका 50 वर्षीय ट्रक चालकाचा खून करून त्याच्या ताब्यातील ट्रक व ट्रकमधील डाळींचे 125 कट्टे असा एकूण सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तानाजी खंडेराव झोंधळे(रा.जऊळके ता.दिंडोरी जि. नाशिक) यांनी दिनांक 8 ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मालकीच्या स्वराज माझदा एम.एच.15 इजी-5671 वर द्वारका सुकराम जाधव (वय 50) हे चालकाचे काम करीत होते. दि 7 आॕगस्ट जळगाव एमआयडीसीतील ओम इंडस्ट्रीज मधून नाशिक येथील ग्राहकाला माल देण्यासाठी 125 डाळींचे कट्टे गाडीत भरून ते नाशिक कडे रवाना झाले परंतू त्याच मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी करंजी गावाजवळ ट्रकचालक जाधव यांच्या गळ्यावर आणि पोटावर धारदार चाकूने वार करून त्यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांच्या जवळील डाळीच्या कट्ट्याने भरलेला ट्रक व त्यातील माल असा 6 लाखांचा ऐवज घेऊन हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला चाकू
शोधून काढलेला आहे घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी सचिन गोरे व त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी करीत आहे