क्राईम

ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार

यावल दि-31/08/2020 बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुचाकी आणि मालवाहू ट्रक यांच्या जोरदार धडक झाल्याने अपघात झालेला असून या अपघातात मुकेश लोटन सोनार, वय ५५ वर्ष, मेहरूण जळगाव हा जागीच ठार झालेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, साकळी या गावातील मालवाहू 407 मिनीट्रक क्रमांक MH- 19 4100 हा जळगाव येथे माल आणण्यास जात असताना चुंचाळे फाट्याजवळ ट्रक व दुचाकीमध्ये जोरदार धडक झाल्याची माहिती नागरिकांकडून मिळालेली आहे. या अपघातात मुकेश लोटन सोनार, वय ५५ वर्ष मेहरूण जळगाव हे जागीच ठार झालेले असून रुपेश सोनार, वय ३५ हे गंभीर जखमी झालेले आहे. दोघेही मेहरूण जळगाव येथील रहिवासी आहेत. वरील दोघे जण दुचाकी क्रमांक MH-19 CQ 2989 ने जळगावहून यावलकडे येत होते.तसेच जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.या घटनेत 407 मिनीट्रक चालक सलिम अब्दुल शेख रा .साकळी ता.यावल याचे विरोधात यावल पोलिसात गुरन-147 भां.द.वी. कलम 304, 337, 279, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास पो.हे.काॕ. संजय देवरे हे करीत आहे.दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावरील वळणावर कृजर गाडीचा अपघात झालेला होता. यामध्ये सहा जण जखमी झाले होते. तर गाडीचे खूप मोठे नुकसान झाले होते. सदरील रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.