ठाणे ते मुलुंड दरम्यान रेल्वेचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक

भुसावळ- दिनांक 23 / 24.1.2021 (शनिवार / रविवारी रात्री) आणि दिनांक 24 / 25.1.2021 रोजी कोपरी रोड ओव्हर ब्रिजचे गर्डर चे काम साठी ठाणे ते मुलुंड स्थानकां दरम्यानच्या 5 व 6 लाइन मार्गावर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक करण्यात येणार आहे . रविवार / सोमवार रात्री). दोन्ही रात्री 01.00 वाजेपासून ते 04.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक चालविला जाईल.
यामुळे दोन्ही दिवसांची काही विशेष गाडी रद्द आणि शॉर्ट टर्मिनेट करण्यात आले आहे. भुसावळ मंडळ मधून धावणाऱ्या गाड्या विवरण पुढीलप्रमाणे
A)मेल / एक्सप्रेस विशेष गाड्या रद्द
*07058 सिकंदराबाद-मुंबई स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 23.1.2021 आणि 24.1.2021
*07057 मुंबई-सिकंदराबाद स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 24.1.2021 आणि 25.1.2021
B) खालील विशेष गाड्या दादर / ठाणे व कल्याण येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील
*02541 गोरखपूर-एलटीटी स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 22.1.2021 आणि 23.1.2021
*02810 हावडा-मुंबई विशेष प्रस्थान स्टेशन दिनांक 22.1.2021 आणि 23.1.2021
*01142 आदिलाबाद-मुंबई विशेष प्रस्थान स्टेशन दिनांक 23.1.2021 आणि 24.1.2021
*05267 रक्सौल-एलटीटी स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 23.1.2021
*02106 गोंदिया-मुंबई विशेष प्रस्थान स्टेशन दिनांक 23.1.2021आणि 24.1.2021
*02138 फिरोजपूर-मुंबई विशेष प्रस्थान स्टेशन दिनांक 22.1.2021आणि 23.1.2021
*02190 नागपूर-मुंबई विशेष प्रस्थान स्टेशन दिनांक 23.1.2021 आणि 24.1.2021
पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. होणाऱ्या गैरसोयी बद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती आहे.अशी माहिती
भुसावल रेल्वे मंडळातर्फे दिनांक-20.01.2021 NO-PR/2021/01/23. या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आलेली आहे.