ठाणेराजकीय

ठाण्यात शिवसेनेला मोठे खिंडार, तब्बल 66 नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील


ठाणे:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल 40 आमदार फोडून भाजपच्या मदतीनं सत्तांतर घडवून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शिवसेनेला आणखी एक मोठा झटका दिलेला आहे.

ठाणे महानगरपालिकेतील 66 विद्यमान नगरसेवक फुटले

ठाणे महानगरपालिकेतील 66 विद्यमान नगरसेवक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आहेत. ठाण्यातील 66 नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला. या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रीतपणे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ठाणे शहरातील राजकीय गोटात एकच खळबळ उडालेली आहे. तब्बल 66 नगरसेवक एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने ठाण्यातील शिवसेनेचे अस्तित्त्व पूर्णपणे पुसले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला आता ठाण्यात नवी पक्षबांधणी करावी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
ठाणे महागनरपालिकेतील 66 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आजपर्यंत शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे हेच ठाणे जिल्ह्यातील कारभार एकहाती सांभाळत होते. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारल्यापासूनच ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेतील एक मोठा गट फुटेल, अशी अटकळ राजकीय जाणकारांकडून बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे. थोडेथोडके नव्हे तर तब्बल 66 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात गेल्याने आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा विधिमंडळातील गट फोडल्यानंतर आता पक्षाच्या खासदारांमध्येही फूट पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा पक्षसंघटनेकडे वळवला आहे. एवढेच नव्हे तर या बंडाची लागण मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकांमध्येही होऊ शकते.अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.