क्राईम

ठेवीदाराच्‍या ठेव वसुली प्रकरणी रायसोनी पतसंस्थेची मालमत्ता जप्तीचे आदेश

भुसावळ- जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑप. क्रेडीट सोसायटी या पतसंस्थेत जामनेर येथील रहिवाशी ईश्वर तेली, प्रकाश मोतीलाल सरताळे व शैलेश प्रकाश सरताळे यांनी मुदत ठेव रक्कम जमा केली होती. सदर ठेवीची रक्कम परत न मिळाल्याने या ठेवीदारांनी जळगांव येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारणं मंचाकडे ग्राहक तक्रार क्रं.२४१ व २४२/ २०१७ ग्राहक सरंणक्ष कायदा १९८६कलम १२ अन्वये दोन वेगवेगळया केसेस दाखल केल्‍या होत्‍या.सदर तक्रार अंशत: मंजूर झाली असून ग्राहक मंचाने निवाडा पारीत केलेला आहे.या निवाड्याप्रमाणे रक्कम वसुलीसाठी उपरोक्‍त ठेवीदारांनी ग्राहक मंचासमोर ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम २५ अन्वये वसुली अर्ज क्र.०३/२०१९ व ०४/२०१९ दाखल केले होते. ग्राहक मंचाने सदर वसुली अर्जात वसुली प्रमाण पत्र पारीत करुन जिल्हाधिकारी जळगाव यांना रक्कम वसुली बाबत आदेश दिले. सदर संस्था अवसायनात आहे. या आदेशाचे अनुषंगाने जिल्हाधिकारी जळगांव यांनी सदरील रक्कम वरील संस्था व अवसायकाकडून महसूल अधिनियम १९६७कलम १७अन्वये दि.२८ नोव्‍हेंबर २०१९ रोजी तहसिलदार यांना आदेश करुन रक्कम वसुली बाबत आदेश पारीत केले. या आदेशान्वये तहसिलदार, जळगांव यांनी वरील संस्थेचा जळगांव येथील निमखेडी शिवार गट नं.११८/३/प्लॉट/३३ मधील क्षेत्र आर.चौ.मी.६४५.१२ जमीन महसूलाची थकबाकी म्हणून ३लाख ३८ हजार ६९७ रु.+१लाख ६२हजार २७५ दि.१७ नोव्‍हेंबर २०१८ पासून द.सा.द. शे. ९ टक्के व्याज इतकी रक्कम देण्यास कसूर केल्याने तहसिलदार जळगांव यांचे कार्यालयाचे पुढील आदेशापर्यंत त्या मालमत्तेची विक्री, देणगी हस्तांतरण करण्यास मनाई केली आहे व वरील मिळकतीच्‍या सातबारा उता-यावर इतर हक्कात नाव दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे असा स्थावर मालमत्तेच्या जप्तीचा आदेश नियम ११ नमुना ४ अन्वये क्रं.आर.आर.सी/करतस/१२/२० तहसिलदार यांचे कार्यालय, जळगांव दि.१७आॅगस्‍ट २०२० रोजी आदेश देऊन तलाठी पिंप्राळा यांना मंडळ अधिकारी, जळगांव यांनी सदरच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आदेशाची नोंद घेऊन उपरोक्त गटाचे सातबारावर सरकार नाव दाखल करुन दुरुस्त उतारा तहसिल कार्यालय, जळगांव येथे तात्काळ सादर करावा असा आदेश पारीत केला.
ठेवीदार तर्फे भुसावळ येथील अॅड.राजेश एस.उपाध्याय, भुसावळ यांनी काम पहिले व त्यांना अॅड.जितेंद्र भतोडे,अॅड. कैलाश शेळके, व अॅड.विनोद तायडे यांनी सहकार्य केले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.