राजकीय

डाॕ नितु पाटील यांचे कार्य सराहनिय – डाॕ अजित गोपछडे

जळगाव – उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात भाजप वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.नितु पाटील यांनी कार्यकारिणी जाहीर झाल्याबरोबर अल्पावधीतच विविध वैद्यकीय प्रश्नांबाबत प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला आहे तसेच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्या वैद्यकीय आघाडीचा वेगळा ठसा उमटवला आहे,असे डॉ.नितु पाटील यांचे कार्य सराहनीय आहे.असे कौतुकास्पद उद्गार आज भाजपचे प्रदेश वैद्यकीय आघाडीचे मुख्य संयोजक डॉ.अजीतजी गोपछडे यांनी काढलेले आहे..
भाजपच्या प्रदेश वैद्यकीय आघाडीतर्फे शनिवारी नाशिक मध्ये उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांची बैठक घेण्यात आली.यावेळी डॉ.गोपछडे पुढे म्हणाले की,कोरोना काळात डॉ.नितु पाटील यांनी आशा स्वयंसेविका, पोलिस बंधू यांना हातमोजे वाटप,अन्नदान करणे विशेष म्हणजे कोरोना संक्रमित रुग्णांचे वाढदिवस साजरे करणे आणि त्यांचे मनोबल वाढविणे, असे विविद्ग उपक्रम राबविले आहेत.आता आघाडीच्या वतीने मोहल्ला क्लिनिक सुरु करून गोरगरिबांना मोफत उपचार देण्यासंबंधी आणि इतर विविध कार्याबद्दल आणि उत्तर महारष्ट्रात संघटनात्मक चर्चा झाली.
यावेळी डॉ.नितु पाटील यांचा “विशेष सत्कार ” महाराष्ट प्रदेश वैद्यकीय आघाडीचे मुख्य संयोजक डॉ.अजीतजी गोपछडे अन्च्या हस्ते झाला.यावेळी नाशिक भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ.प्रशांत पाटील,डॉ.भालचंद्र ठाकरे,डॉ.चंद्रशेखर नामपूरकर, डॉ.योगेश पाटील, डॉ.रघुनाथ नामपूरकर, जळगाव मधील डॉ.नरेंद्र ठाकूर,डॉ.धर्मेंद्र पाटील, तसेच धुळे, नंदुरबार, नाहीक, अहमदनगर येथील सर्व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन विलास भदाणे यांनी केले.
जे जे तुमच्या मनात ,ते ते आमच्या कार्यात…!

जळगाव जिल्हा वैद्यकीय आघाडीचे कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय असे राहील.आगामी काळात प्रत्येक तालुकास्थरावर कार्यकारिणी तयार करून जळगावला वैद्यकीय आघाडीचा भव्य मेळावा घेण्यात येईल.वैद्यकीय क्षेत्रांतील प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य द्वारे होईल , अशी माहिती डॉ.नितु पाटील,सहसंयोजक उत्तर महाराष्ट्र,भाजप वैद्यकीय आघाडी यांनी दिलेली आहे

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.