Crimeसांगली

डॉक्टर कुटुंबातील 9 जणांचे मृतदेह आढळून आल्याने परीसरात प्रचंड खळबळ

डॉक्टर कुटुंबातील 9 जणांचे मृतदेह आढळून आल्याने परीसरात प्रचंड खळबळ

सांगली दि-20 : जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे यात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या सर्वांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे. यानंतर नेमकं या 9 जणांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे, हे समोर येईल असं पोलिसांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
नरवाड रोड अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी 9 जणांचे मृतदेह आढळून आल्याने या परीसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्यासह दोघांच्या आई, पत्नी आणि मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे.
डॉ माणिक यल्लप्पा वनमोरे पत्नी रेखा माणिक वनमोरे,आई आकताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे , मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतण्या शुभम पोपट वनमोरे राजधानी हॉटेलजवळ तर दुसरीकडे घरात डॉ.माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीत पोपट वनमोरे , मुलगी अर्चना पोपट वनमोरे यांचे मृतदेह आढळून आले आहेत. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे यांनी फौजफाटा घेऊन भेट देत पंचनामा केला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.