आरोग्य

तंबाखूचे सेवन आरोग्यास घातक

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक तंबाखू विरोधी दिन मंगळवार, ३१ मे रोजी जिल्हा रुग्णालयाच्यावतीने साजरा करण्यात येतो.  यंदा जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक तंबाखू विरोधी दिन २०२२ चे घोषवाक्य (Theme) Tobacco a threat to our environment म्हणजेच “तंबाखू आपल्या वातावरणाला धोकादायक” दिले आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थाचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणामाबाबत समाजात जनजागृती व्हावी या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत तंबाखूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तीचे व्यसन सोडण्याकरीता तंबाखूमुक्ती समुपदेशन केंद्रामार्फत समुपदेशन केले जाते. तसेच तंबाखूमुक्ती करीता टोल फ्री क्रमांक १८००११२३५६ किंवा ०११-२२९०१००१ या क्रमांकावर मोफत समुपदेशन उपलब्ध असल्याचे कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वय सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. एम. मोतीपवळे सांगतात.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ३१ मे तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो, त्याचप्रमाणे याही वर्षी राज्यभरात जागतिक तंबाखू नकार दिन साजरा करण्याचे केंद्र शासनाने कळवले आहे. या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेची थिम “Tobacco Threat to our Environment ” ही आहे. तंबाखूजन्य पदार्थामुळे सभोवतालचे पर्यावरण व त्यामुळे मानवी जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांवर आधारित आहे, ही संकल्पना यामागे आहे.

भारतीय संविधानानुसार प्रदुषणमुक्त हवा हा सर्व नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. त्यानुसार जे व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतात, अशा व्यक्ती इतरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करण्यास कारणीभूत ठरतात. धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तीचे मुलभूत अधिकार बंधित करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार तंबाखूच्या सेवनामुळे आजतागायत ८.४० कोटी टन कार्बनडायऑक्साइट वातावरणात उत्सर्जित केला गेला. या बाबी जागतिक हवामान बदलाकडे आपणास घेऊन जात आहेत.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.